IND vs PAK: विश्व कप 2023 मध्ये भारतीय संघ आपला पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहे. भारताने आपल्या मागच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभव केला आहे तर पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला आहे. यामुळे या सामन्यात दोन्ही संघाकडून कडवी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे भारतीय संघासमोर प्लेइंग 11 शी संबंधित मोठा प्रश्न उभा झाला आहे.
शमी, अश्विन की शार्दुल?
अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा भाग बनवण्यात आला होता. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये सामील करण्यात आले. त्याचबरोबर मोहम्मद शमीलाही संधी मिळायला हवी, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
आता अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की या तीन खेळाडूंपैकी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या शानदार सामन्यात कोणाला संधी द्यायची. मात्र, हे टॉसच्या वेळीच कळेल जेव्हा रोहित शर्मा अंतिम 11 ची घोषणा करेल. या तिन्ही खेळाडूंचा अलीकडचा फॉर्म पाहिला तर त्यापैकी एकही खेळाडू इतरांपेक्षा कमी दिसत नाही.
मात्र, अलीकडच्या काळात मोहम्मद शमीने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत यामुळे या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, भारत-पाकिस्तान यांच्यातील या महान सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेतही दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारतीय संघ विजयी झाला होता.
आता विश्वचषक 2023 च्या या सामन्यात शेवटी कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.