मुंबई: T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन संघ आता आठवडाभरानंतर पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि या स्पर्धेनंतर दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे आणि ती शुक्रवार 18 नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकादरम्यान काही सामन्यांमध्ये पावसाचा प्रभाव पाहता शेजारील देश न्यूझीलंडमधील चाहत्यांनाही या सामन्यावर हवामानाचा परिणाम होण्याची भीती वाटत असून वेलिंग्टनमधील परिस्थितीही चांगली दिसत नाहीये.
तीन सामन्यांच्या मालिकेला न्यूझीलंडच्या राजधानीपासून सुरुवात होत आहे, परंतु हवामान खात्याचा अंदाज सांगत आहे की, मालिकेतील पहिल्याच सामन्यावर पावसाचा मोठा परिणाम होऊ शकतो. वेलिंग्टनमध्ये शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी हवामान फारच थंड आहे असे नाही, तर संध्याकाळी जेव्हा सामना सुरू होणार आहे तेव्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस संध्याकाळी खेळ खराब करू शकतो
हवामान ट्रॅकिंग वेबसाइट Accuweather च्या अंदाजानुसार, वेलिंग्टनमध्ये शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान पाऊस पडू शकतो. पावसाची शक्यता ७० टक्क्यांपर्यंत असली तरी त्याचे प्रमाण फारसे नाही. मात्र, सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत पावसाची शक्यता 80 ते 70 टक्के असून यादरम्यान 2.5 ते 3 मिमी पाऊस पडू शकतो.
सामना वेलिंग्टनमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता) सुरू होईल. म्हणजेच या काळात पावसाचा अंदाज आहे आणि अशा स्थितीत सामन्यावर परिणाम होईल. सामन्यावर पावसाचा परिणाम झाल्यास, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी केलेल्या नियमांनुसार, सामन्याच्या अधिकृत मैदानाची स्थिती योग्य असल्यास किमान 5-5 षटकांचा सामना होणे आवश्यक आहे. हे शक्य न झाल्यास सामना रद्द करावा लागेल.
मालिकेतील उर्वरित सामने कुठे होणार?
टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, वेलिंग्टननंतर या मालिकेत आणखी दोन सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील दुसरा सामना रविवारी 20 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. त्यानंतर शेवटचा सामना मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी नेपियर येथील मॅक्लीन पार्क येथे होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडविरुद्ध टी 20 सामन्यांची मालिका आजपासून; भारताच्या ‘या’ खेळाडूंनी केला कसून सराव
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे ‘हे’ फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांना मात देण्यात माहिर; जाणून घ्या सविस्तर