मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमधील बे ओव्हल येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला असून, रिषभ पंत आणि इशान किशन ही जोडी चांगली खेळी करत आहेत. भारताने पहिल्या 5 ओवरमध्ये एकही गडी न गमावता 35 धावा काढल्या आहेत.
युझवेंद्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळालेले नाही. ट्रेंट बोल्टच्या जागी अॅडम मिल्नेचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. पहिला T20 सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. न्यूझीलंड दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
भारताचे प्लेइंग 11: इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचे प्लेइंग 11: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), केन विल्यमसन (c), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.
- हेही वाचा:
- न्यूझीलंड विरुद्ध भारताचा दुसरा T20 सामना; कसा असेल भारताचा प्लेइंग इलेव्हन संघ जाणून घ्या
- भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्यांची आकडेवारी आहे मनोरंजक; जाणून घ्या सविस्तर या वृत्तातून