मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे.
ऋषभ पंतला न्यूझीलंडविरुद्ध मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. 13 चेंडूत केवळ 6 धावा करून तो बाद झाला. या डावखुऱ्या फलंदाजाने लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर टिम साऊथीचा झेल घेतला. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाला केवळ 42 धावा करता आल्या. दोन्ही फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये मुक्तपणे खेळावे लागणार आहे.
मैदानावर इशान किशन आणि सुर्यकुमार खेळत असून भारताने 1 गडी गमावत 50 रनांचा टप्पा पूर्ण केला आहे. किशन आज चांगल्या फॉर्म मध्ये असून त्याने २८ धावा केल्या आहेत तर सुर्यकुमार ही त्याच्याबरोबरीने चांगली खेळी करत असून त्यानेही ६ धावा काढलेल्या आहेत. मात्र यांनतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना थांबवावा लागला आहे.
- हेही वाचा:
- IND vs NZ T20 Series: दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने जिंकले नाणेफेक; भारत करणार प्रथम फलंदाजी
- द्रविडला शास्त्रींनी फटकारले; त्यावर ‘या’ स्टार खेळाडूने दिले उत्तर, पहा काय म्हणाला हा खेळाडू