मुंबई: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ हॅमिल्टन येथे रविवारी २७ नोव्हेंबर रोजी मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. एकदिवसीय मालिकेत टिकण्यासाठी भारताला दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. त्याचबरोबर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने किवी संघासमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले. टॉम लॅथमच्या स्फोटक शतकाच्या जोरावर किवी संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला. दुसऱ्या वनडेत पावसाची छाया आहे.
हॅमिल्टनचे हवामान कसे आहे ते जाणून घ्या
हवामान खात्यानुसार रविवारी हॅमिल्टनमध्ये पावसाचा धोका आहे. रविवारी सकाळी येथे पावसाची 20 टक्के शक्यता आहे. तेथे दुपारनंतर पावसाची ९० टक्के शक्यता आहे. न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. त्यावेळी 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतासाठी दुसरा एकदिवसीय सामना करा किंवा मरोसारखा आहे. जर टीम इंडिया हा सामना हरला तर न्यूझीलंड मालिका जिंकेल. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर भारताला मालिका जिंकता येणार नाही. अशा स्थितीत टीम इंडिया तिसरी वनडे जिंकूनच मालिका बरोबरीत आणू शकेल. या मैदानावर नाणेफेक खूप महत्त्वाची ठरणार आहे.
रविवारी, हॅमिल्टनमध्ये तापमान 11 अंश ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. दिवसभर मैदान ढगाळ राहील. त्याचबरोबर आर्द्रताही ९५ टक्क्यांच्या आसपास राहणार आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघः शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दीपक चहर, अर्शदीप सिंग, शार्दुल ठाकूर , उमरान मलिक.
एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (विकेटकीपर), अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.
- हेही वाचा:
- टॉम लॅथम आणि केन विल्यमसनने ईडन पार्कमध्ये आणली रंगत ; न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय
- शुभमन गिल चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये पदार्पणाच्या वनडेत ठरला होता अपयशी; आजच्या सामन्यात केली कसर पूर्ण