मुंबई: टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपला प्रवास संपवून भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर 3 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप खेळणाऱ्या टीम इंडियाचे अनेक खेळाडू न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनला पोहोचले आहेत. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि ऋषभ पंत या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ 18 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.
हार्दिक पांड्या टी-20 आणि शिखर धवन वनडेमध्ये असेल कर्णधार
टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये टी-20 संघाची कमान हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिखर धवनला पुन्हा एकदा वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 18 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 20 नोव्हेंबरला आणि तिसरा सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना 27 नोव्हेंबरला आणि तिसरा सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांचे वेळापत्रक
पहिला T20I – 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे
दुसरा T20I – 20 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथे
तिसरा T20I – 22 नोव्हेंबर नेपियर येथे
पहिली वनडे – २५ नोव्हेंबर ऑकलंड येथे
दुसरी वनडे – 27 नोव्हेंबर हॅमिल्टन येथे
तिसरी वनडे – ३० नोव्हेंबर क्राइस्टचर्च
T20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, उम्मन मलिक.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरदेव. मलिक
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: ICC ने टी 20 विश्वचषक २०२२ मधील सर्वोत्तम संघ केला जाहीर; ‘या’ भारतीय खेळाडूंचाही यात समावेश
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंड बनला टी 20 तील विश्वविजेता; पाकिस्तानशी केला जुना हिशोब चुकता