IND vs IRE 2024: T20 विश्वचषक 2024 मध्ये 05 जून रोजी न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजाने कहर करत आयलँड संघाला अवघ्या 96 धावांवर ऑल आउट केलं. यानंतर 8 गडी राखून आयर्लंडचा पराभव केला.
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा संघ 16 षटकांत सर्वबाद 96 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 12.3 षटकांत दोन गडी गमावून टार्गेट पूर्ण केलं.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. रोहितने 37 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्याशिवाय यष्टीरक्षक ऋषभ पंतने 26 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 36 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का विराट कोहलीच्या रूपाने बसला. तिसऱ्या षटकात 22 धावांवर कोहलीला मार्क एडायरने बेंजामिन व्हाईटकरवी झेलबाद केले. विराटला एक धाव करता आली. रोहित आणि विराट जवळपास दोन वर्षांनंतर टी-20 मध्ये सलामीला आले. मात्र, ही रणनीती पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरली. आयर्लंडकडून मार्क एडेअर आणि बेन व्हाईटने प्रत्येकी एक विकेट घेतली.
याआधी आयर्लंडची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टर्लिंग दोन धावा करून बाद झाले तर बालबिर्नी पाच धावा करून बाद झाले. यानंतर हार्दिक पांड्याचा कहर पाहायला मिळाला. त्याने लॉर्कन टकर (10), कर्टिस कान्फर (12) आणि मार्क एडेर (3) यांना बाद केले.
त्याचवेळी जसप्रीत बुमराहने हॅरी टेक्टर (4) आणि जोशुआ लिटल (14) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजने जॉर्ज डॉकरेलला (3) तर अक्षर पटेलने बॅरी मॅकार्थीला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डेलानी शेवटची विकेट म्हणून नो बॉलवर फ्री हिटवर धावबाद झाला. भारताकडून हार्दिकने तीन बळी घेतले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.