IND vs ENG: ‘बाजबॉल’ फेल! ‘या’ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने दाखवला दम

IND vs ENG: भारताने ‘बाजबॉल’ ला फेल करत इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 अशा मोठ्या फरकाने जिंकली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत भारतीय संघाचा पराभव केला होता मात्र त्यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ही मालिका 4-1 ने ही मालिका जिंकली आहे.

या मालिकेचा शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळवण्यात आला होता. आज हा सामना भारताने एक डाव आणि 64 धावांच्या फरकाने जिंकला. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडला केवळ 218 धावांवर रोखले.

मालामाल करणारी योजना! मिळणार दुप्पट पैसे, मग विचार कसला ?

यानंतर भारताने पहिल्या डावात 477 धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 150 चेंडूत 110 धावा केल्या तर रोहितने क्रीजवर असताना 162 चेंडूंचा सामना करताना एकूण 103 धावा केल्या.त्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खाननेही अर्धशतक झळकावले. यामुळे भारताने 259 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव गडगडला पहिल्या डावानंतर 259 धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या डावातही काही करता आलं नाही. भारतीय फिरकीपटूंसमोर इंग्लडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. संघाकडून फक्त जो रूटने शानदार खेळी केली.

I.N.D.i.A. आघाडीला धक्का! मायावतींची मोठी घोषणा; अनेक चर्चांना उधाण

रूटने अर्धशतक झळकावले, जरी तो एकटाच राहिला आणि बाकीचा संघ केवळ 195 धावांवर बाद झाला. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज रविचंद्रन अश्विन होता, ज्याने आपल्या 100 व्या कसोटीत पाच विकेट्स घेत इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले.

Leave a Comment