IND vs Ban : पुढील महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्वाची असणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देणार आणि कोणाला आराम देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माहितीनुसार, या मालिकेत ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित आणि कंपनीची कामगिरी कशी होईल, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. आता BCCI कडून लवकरच 15 सदस्यीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. संघात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना वर्कलोडमुळे विश्रांती दिली जाऊ शकते. दोन्ही खेळाडूंना विश्रांती दिल्यास त्यांच्या जागी कोणाचा समावेश होणार आहे हे देखील पाहावे लागेल. जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा मेन गोलंदाज आहे.
भारतीय संघातील संभाव्य 15 खेळाडू
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, ध्रुव जुरेल ( यष्टिरक्षक) आणि प्रसीध कृष्णा.