IND Vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या मध्य प्रदेशातील इंदूर शहरात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.
मात्र सामन्याच्या पहिल्या दिवसापासून खेळपट्टीबाबत आणि चर्चांना उदंड आला आहे याचे मुख्य कारण म्हणजे सामन्याचे पहिलेच दिवशी तब्बल 14 विकेट पडले आहे यामुळे फॅन्स देखील नाराज होत आहे.
कसोटी क्रिकेट हा विनोद बनला आहे : वेंगसरकर
भारतातील कसोटी तीन दिवसांत संपवण्याची पद्धत योग्य नाही, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
वेंगसरकर म्हणाले, ‘चांगले क्रिकेट बघायचे असेल तर खेळपट्टीमुळेच फरक पडतो. तुमच्याकडे अशा विकेट्स असाव्यात जिथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांना समान संधी मिळू शकतील. पहिल्याच दिवसापासून आणि पहिल्याच सत्रापासून चेंडू वळायला लागला आणि तोही असमान उसळीने, तर त्यामुळे कसोटी क्रिकेटची खिल्ली उडवली जाते.
वेंगसरकर म्हणतात, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनी कसोटी क्रिकेटसाठी मैदानात येणे. रंजक असेल तरच लोक कसोटी क्रिकेट पाहायला येतील. पहिल्या सत्रापासूनच गोलंदाजांनी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलेले पाहण्यासाठी कोणत्याही प्रेक्षकांची इच्छा नसते. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी मॅथ्यू हेडनही इंदूरच्या खेळपट्टीवर नाराज आहे.
हेडन म्हणाला, ‘कोणत्याही प्रकारे, सहाव्या षटकापासूनच फिरकीपटूंनी गोलंदाजीसाठी येऊ नये. त्यामुळे मला अशा खेळपट्ट्या आवडत नाहीत. पहिल्या दिवसापासून खेळपट्टी इतकी टर्न-टेकिंग नसावी. ही कसोटी ऑस्ट्रेलिया जिंकली की भारत याने काही फरक पडत नाही. अशा खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटसाठी चांगल्या नाहीत.
कारवाई करणार आयसीसी
पाहिल्या दिवशी उपाहारानंतर भारतीय संघाचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाने 156 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. आता इंदूर कसोटी खेळपट्टी प्रकरणी आयसीसीकडून मोठी कारवाई होऊ शकते.
सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड इंदूर येथील खेळपट्टीच्या खराब स्वरूपाची दखल घेतील आणि खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्टीला सरासरी रेटिंग गुण मिळाले होते, पण आता इंदूरच्या खेळपट्टीच्या बाबतीत आयसीसी खूप कडक दिसत आहे.
यापूर्वी तिसरा कसोटी सामना धर्मशाला येथे होणार होता, परंतु दोन आठवड्यांपूर्वी हा सामना इंदूरमध्ये आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. अशा परिस्थितीत क्युरेटर्सना खेळपट्टी तयार करण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला असता का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर आले होते, परंतु कसोटी सामना तीन दिवसांत संपणे ही या मोठ्या फॉरमॅटसाठी धोक्याची घंटा आहे.