IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी वेगवान गोलंदाज मायकल कॅस्प्रोविचने (Michael Kasprowicz) ऑस्ट्रेलियन संघाला 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत तीन वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवण्याचा सल्ला दिला आहे. वेगवान गोलंदाजी हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अस्त्र असून संघाने आपली पकड कायम राखली पाहिजे, असे कॅस्प्रोविच म्हणाला.
खरे तर ऑस्ट्रेलियन संघ दिल्ली कसोटीत पॅट कमिन्सच्या रूपाने तीन फिरकीपटू आणि एकच वेगवान गोलंदाज घेऊन उतरला होता. पण, संघाला सहा विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ (Team India) सध्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआधी कास्प्रोविच म्हणाला, की आम्हाला तीन स्पीन गोलंदाजांची काहीच गरज नाही. या सामन्यात कॅमेरून ग्रीनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे कारण तो मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो.
दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. पुढील सामना आता औपचारिकतेचाच राहिला आहे. मात्र ऑस्ट्रेलियासाठी हा सामना महत्वाचा राहणार आहे. किमान या सामन्यात तरी विजय मिळवायचा या हेतून ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न राहणार आहे.