Income Tax: आपल्या देशात मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. वर्षभरात झालेल्या आर्थिक उलाढालीचा काही भाग टेक्सपेयर टॅक्सच्या स्वरूपात सरकारला देतात.
मात्र तुम्हाला माहित आहे का देशात काही असे देखील मार्ग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या टॅक्स वाचू शकतात आणि तुमच्या भविष्यासाठी मोठी बचत करू शकतात.
आम्ही तुमच्यासाठी टॅक्स सविंगचे काही चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.
तुमच्याकडे आयकर रिटर्न भरण्यासाठी आणि कर वाचवण्यासाठी 31 मार्चपर्यंतच वेळ आहे. कर वाचवण्यासाठी तुम्ही ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक केल्यास, आयकर रिटर्न भरताना तुम्ही कपात केलेल्या पैशाचा दावा करू शकता. आयकर कायद्यांतर्गत कर वाचवण्यासाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या पर्यायांद्वारे तुम्ही भरपूर कर वाचवू शकता. तुम्ही कर कसा वाचवू शकता ते जाणुन घ्या.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
NPS ही सरकारची सेवानिवृत्ती योजना आहे. जे त्यांच्या बचतीवर धोका पत्करत नाहीत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. वृद्धापकाळासाठी गुंतवणूक करणारे असे लोक या योजनेत गुंतवणूक करून सेवानिवृत्ती निधी वाढवू शकतात. यामध्ये तुम्ही कलम 80CCD अंतर्गत कमाल 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता.
विमा योजना
जीवन विमा आणि आरोग्य विमा हे संतुलित पोर्टफोलिओचे महत्त्वाचे भाग आहेत. विमा योजना तुमच्या मालमत्तेचे अचानक घडलेल्या नुकसानीपासून संरक्षण करते. यासह, विमा पॉलिसी प्रीमियमवर प्राप्तिकर कायद्याच्या काही कलमांनुसार कर लाभ प्रदान करते.
भविष्य निर्वाह निधी (PF)
तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी भविष्य निर्वाह निधी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये योगदान देणारे कर्मचारी कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. ही योजना 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येते. आजकाल PPF लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. लोक याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. यामध्ये तुम्हाला वर्षाला चक्रवाढ व्याज मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत, तुम्हाला यामध्ये कर लाभ देखील मिळतो. सध्या या योजनेवर तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे.
ELSS
PPF नंतर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच (ELSS) हा सर्वोत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडाची ही योजना कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ देते. याला टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड असेही म्हणतात. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता.