Income Tax Return : सावधान! ITR फाईल करताना टाळा ‘या’ महत्त्वाच्या चुका, नाहीतर याल आर्थिक संकटात

Income Tax Return : प्राप्तिकर रिटर्न भरताना तुम्हाला चुका टाळणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. अनेकदा तुम्हाला पुन्हा आयटीआर फाईल करावा लागेल तसेच दंड देखील भरावा लागेल.

भरावा फॉर्म-16

पगारदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोक्त्याकडून प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म-16 जारी करण्यात येतो. हे लक्षात घ्या की हा फॉर्म सहसा मे पर्यंत दिला जातो. हे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न आणि नियोक्त्याने कपात केलेल्या कराची माहिती देते.

करा हे काम

तुम्ही अजून पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर आधी हे काम पूर्ण करा. वेळेवर पूर्ण परतावा मिळवायचा असेल तर तुमचा मोबाईल आणि पॅन नंबर तुमच्या बँकेत चेक करून घ्या. यात जर त्रुटी आढळली तर बँकेला केवायसीसाठी विचारा.

फॉर्म-16 नसेल तर

तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल, तर वार्षिक माहिती विधान आणि फॉर्म 26AS पुरेसे असू शकतात. या दोन्ही फॉर्ममध्ये करदात्याने संपूर्ण आर्थिक वर्षात केलेले सर्व व्यवहार, मिळविलेले एकूण उत्पन्न, गुंतवणूक, कंपनीने कापलेला TDS यांचा तपशील असतो.

टाळा या चुका

चुकीची वैयक्तिक माहिती

आयटीआर भरत असताना करदात्यांनी नाव, पॅन, पत्ता आणि बँक खाते तपशील यासारखी सर्व वैयक्तिक माहिती फॉर्ममध्ये योग्यरित्या भरलेली आहे का नाही हे सुनिश्चित केले पाहिजे.

चुकीचा फॉर्म निवडणे

उत्पन्नाचा स्रोत आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार योग्य ITR फॉर्म निवडावा. चुकीचे फॉर्म भरल्यास दंड होतो.

उत्पन्नाबद्दल संपूर्ण माहिती

आयटीआरमध्ये पगार, व्याज उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, भांडवली नफा यासह सर्व स्त्रोतांकडून मिळणा-या उत्पन्नाची माहिती देणे गरजेचे आहे.

TDS

हे लक्षात घ्या की ITR मध्ये नियोक्त्याने जारी केलेल्या फॉर्म 16 आणि 16A मधील TDS चे तपशील नमूद करणे गरजेचे आहे. योग्य TDS माहिती प्रदान करण्यात अयशस्वी झाला तर दंड होऊ शकतो.

गुंतवणूक आणि वजावट

कलम 80C, 80D, 80G अंतर्गत पात्र कर लाभांचा दावा करण्यासाठी सर्व गुंतवणूक, खर्च आणि कपात घोषित करणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाला तर तुमचे कर दायित्व वाढू शकते.

व्याजातून मिळणारे उत्पन्न

बचत खाते, एफडी किंवा अन्य स्रोतातून मिळालेले व्याज उघड करणे अनिवार्य आहे.

ITR वेळेवर दाखल करा

ITR उशीरा दाखल केल्यास दंड आकारला जातो.

Leave a Comment