Income Tax : करदात्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला आयटीआर दाखल केल्यानंतरही आयकर नोटीस येऊ शकते. करदात्यांनी लगेचच या महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या.
परदेशी मालमत्ता
तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित सर्व माहितीही शेअर करणे गरजेचे आहे. परदेशात तुमची कोणतीही मालमत्ता असल्यास तेही विवरणपत्र भरताना नमूद करा. समजा तुम्हाला त्यातून काही उत्पन्न मिळत असेल तर त्याबद्दलही सांगा.
शुद्धलेखनाच्या चुका
इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर तुम्ही सगळं काही काळजीपूर्वक तपासले पाहिजे. जाणूनबुजून किंवा नकळत कोणतीही चूक करू नका. विशेषत: नाव आणि पत्ता यासारख्या गोष्टींमध्ये शुद्धलेखनाच्या चुकांकडे लक्ष द्या. PAN, आधार आणि ITR मध्ये सारखीच माहिती असावी.
सवलतीसाठी फसवणूक टाळा
अनेकजण करात सूट मिळवण्यासाठी फसवणूक करत असतात. ते खोट्या देणग्या, मुलांच्या शाळेची बनावट फी आणि भाड्याच्या बनावट पावत्या वापरतात. पण, असे लोक आयकर विभागाच्या रडारखाली येत असतात.
प्रोफेशनलकडून दाखल करा आयटीआर
जर तुम्हाला आयटीआर भरताना किरकोळ चुका टाळायच्या असल्यास एखाद्या प्रोफेशनलकडून ते दाखल करा. अशा वेळी त्या लहान चुकांना वाव देखील संपेल, ज्या नंतर तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकतात.
कमाईची माहिती
सर्व करदात्यांनी त्यांच्या कर स्लॅबनुसार त्यांचे कर विवरणपत्र भरणे गरजेचे आहे. उत्पन्नाशी संबंधित सर्व तपशील द्यावा. यात गुंतवणूक आणि व्याजाची कमाईचा समावेश आहे. उत्पन्नाचा कोणताही स्रोत लपवून ठेवला तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.