Income Tax Notice । टॅक्स वाचवण्यासाठी चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर तुम्हालाही येईल नोटीस

Income Tax Notice । दरवर्षी अनेक नोकरदार कर भरत असतात. पण कर टाळण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. जर तुम्हीही कर वाचवण्यासाठी काही चुका करत असाल तर तुम्हालाही आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

आयकर विभागाचे असे मत आहे की आयटीआर भरताना बनावट घर भाडे स्लिप सादर करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असून आयकर विभागाने हे थांबवण्यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात आली आहे. आयटीआर भरत असताना बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली केली जाईल. अहवालानुसार, देशभरात मोठ्या संख्येने लोक आयकर टाळण्यासाठी बनावट घरभाडे स्लिप सादर करतात, हे पाहता आयकर विभाग आता यावर लवकरच आळा घालू शकते.

मागील वर्षभरापासून आयकर विभागाने अशा कारवायांवर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली असल्याने आता तुम्ही बनावट घरभाडे स्लिप सादर केली तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी आयकर विभाग नवीन तंत्रज्ञानावर काम करत असून बनावट घरभाडे स्लिपसाठी अर्ज करणाऱ्यांची ओळख पटवणे सोपे होईल.

असा तपासला जाईल डेटा तपासला

आयकर विभागाच्या मतानुसार, आयकराचा नवीन आयटीआर फॉर्म आणि सुधारित नवीन फॉर्म -16 अशा प्रकारे बनवला आहे की चुकीची आणि बनावट कागदपत्रे दाखल करणाऱ्यांना संगणक आधारित प्रक्रियेद्वारे सहज ओळखू येईल.

दरम्यान, संगणकीय पडताळणीदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा डेटा बरोबर आढळला नाही, तर आयकर विभागाकडून थेट नोटीस पाठवली जाईल. बनावट भाडे स्लिप लावणाऱ्यांचा त्रास वाढेल. आयकर विभागाचे असे मत आहे की नवीन फॉर्म-16 इलेक्ट्रॉनिक मॅचिंगद्वारे फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेल्या डेटाशी जुळेल, म्हणजेच आयकर विभाग त्याच्या सर्व स्रोतांद्वारे फॉर्ममध्ये भरलेल्या डेटाची पडताळणी करणार आहे.

Leave a Comment