Income Tax : बचत खात्यात किती पैसे जमा करावेत असा प्रश्न सर्वांना पडतो. कारण बचत खात्यावर इन्कम टॅक्सची नजर असते. जर तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त पैसे ठेवले तर तुम्हाला कर भरावा लागू शकतो.
एका दिवसात किती रक्कम जमा करता येते? जाणून घ्या सविस्तर
हे लक्षात घ्या की तुम्हाला एका दिवसात तुमच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 1 लाख रुपये जमा करता येते. पण तुम्ही अधूनमधून रोख रक्कम जमा केली तर ही मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवली जाते. जोपर्यंत वार्षिक मर्यादेचा संबंध आहे, तोपर्यंत बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये जमा करता येतात.
जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त पैसे भरले तर तुम्हाला जमा करण्यात आलेल्या रोख रकमेवर कर भरावा लागतो. आयकर रोख रकमेवर लावला जात नाही तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर लावण्यात येतो, हे लक्षात घ्या.
समजा बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा झाली असल्यास तर ही माहिती आयकर विभागाला देण्याची जबाबदारी बँकेची असते. हे लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या बँक ठेवीवर 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागतो.
आयकर कायदा कलम 80TTA अंतर्गत, सामान्य लोकांसाठी एका आर्थिक वर्षात बचत खात्यावर 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर आकारत नसून व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असेल तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत असते. बचत खात्यातून मिळणारे व्याज तुमच्या इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात जोडून त्यानंतर तुम्हाला संबंधित कर कंसानुसार एकूण उत्पन्नावर कर भरावा लागेल.
देशातील आघाडीच्या सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यांवर 2.70 टक्के ते 4 टक्के व्याज देत आहे. 10 कोटी रुपयांपर्यंत शिल्लक बचत खात्यांवर 2.70 टक्के आणि 10 कोटींपेक्षा जास्त रकमेवर 3 टक्के व्याजदर इतके आहे. अनेक छोट्या वित्त बँका बचत खात्यांवर अटींसह ७ टक्के व्याज मिळते.