Income Tax : अनेकजण योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. काही योजना अशा आहेत, ज्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देतात. तुम्ही काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला यात कोणताही कर भरावा लागणार नाही.
काय आहे EEE?
ट्रिपल ई म्हणजे ज्यात गुंतवणुकीच्या वेळी केवळ कर सवलत मिळत नाही, नियमांनुसार परतावा आणि परिपक्वता रक्कम करमुक्त असतो. ही अशी श्रेणी आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून सर्वात जास्त कर वाचवू शकता. या श्रेणीतील प्रमुख योजना आहेत, त्या पुढीलप्रमाणे.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरू केली असून ज्यात 10 वर्षांपर्यंतच्या मुलीचे पालक तिच्या नावावर खाते चालू करू शकतात. एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. सध्या यावर ८.२ टक्के वार्षिक व्याज मिळते. या योजनेत मिळणारे व्याज आणि परिपक्वता रक्कम दोन्ही करमुक्त असते.
युनिट लिंक्ड विमा योजना
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्समध्ये केलेली गुंतवणूक कलम 80C अंतर्गत करमुक्त असून समजा विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या किमान 10 पट असेल. 5 वर्षांनी पैसे काढले तर ULIP ची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम करमुक्त असते. या कालावधीत तुम्ही तुमच्या ULIP योजनेमध्ये उपलब्ध असणाऱ्या दोन पर्यायांमध्ये स्विच केले तर त्यावर कोणताही कर लागू होत नाही. युलिपमध्ये केलेली गुंतवणूक बाजारातील कामगिरीनुसार परतावा देत असते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
PPF मध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सूट मिळत असून यात सुरुवातीचे लॉक-इन 15 वर्षांचे असते, त्यानंतर खाते प्रत्येकी 5 वर्षांसाठी वाढवता येते. त्यावर ७.१० टक्के वार्षिक व्याज देण्यात येते. जे खात्यात जमा केले जाते आणि परिपक्वतेवर दिले जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
EPF ही देखील एक सरकारी योजना असून ज्यात नियोजित कर्मचारी आणि त्यांचे नियोक्ते दोघेही योगदान देतात. हे लक्षात घ्या की कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावर 80C अंतर्गत कर सूट मिळते. यात मिळणारे व्याज 8.25 टक्के आहे. या व्याजावर कोणताही कर नसून कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर तो दरवर्षी त्याच्या इच्छेनुसार EPF खात्यात योगदान देऊ शकतो, ज्याला व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड म्हणतात. एका वर्षात 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर भरावा लागणार नाही.