Income Tax : आयकर विभागाकडून नवीन आर्थिक वर्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. पण जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आयकर तुम्हाला नोटीस पाठवू शकते. अनेकदा आपल्या काही चुकांमुळे आयकर विभाग आपल्यावर कारवाई करते.
मालमत्ता व्यवहार
प्रॉपर्टी रजिस्ट्रारसोबत रोखीने मोठा व्यवहार केला तर त्याचा अहवालही प्राप्तिकर विभागाकडे जातो, हे लक्षात ठेवा. समजा तुम्ही 30 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता रोखीने खरेदी केली किंवा विकली तर त्याची माहिती मालमत्ता निबंधकामार्फत आयकर विभागाला पाठवण्यात येते.
शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बाँड्सची खरेदी
तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असल्यास वेळीच सावध व्हा. तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक वर्षात अशा साधनांमध्ये जास्तीत जास्त 10 लाख रुपये रोख व्यवहार करता येतात. त्यामुळे यापैकी कोणत्याहीमध्ये पैसे गुंतवण्याची तुमची योजना असल्यास पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरण्याची गरज नाही.
क्रेडिट कार्ड बिल
तुम्ही क्रेडिट कार्ड बिलाच्या रूपात एका वेळी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केली तर आयकर विभाग चौकशी करतो. समजा जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची क्रेडिट कार्ड बिले रोखीने भरल्यास तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल विचारले जाऊ शकते.
बँक मुदत ठेव
तुम्ही वर्षातून एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा FD मध्ये 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर आयकर विभाग तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल माहिती विचारू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर बहुतेक पैसे FD मध्ये ऑनलाइन माध्यमातून किंवा चेकद्वारे जमा करा.
बँक बचत खाते ठेव
समजा एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली, तर आयकर विभाग त्या पैशाच्या स्त्रोताविषयी प्रश्न विचारू शकतो. चालू खात्यांमध्ये कमाल मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे, हे लक्षात घ्या.