Inauguration of Waste to Energy Plant: Delhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी गुरुवारी दिल्लीला मोठी भेट दिली आहे. अमित शाह यांनी दक्षिण दिल्लीतील तुघलकाबाद (Tughlakabad) येथे तेहखंड ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste to Energy) प्लांटचे उद्घाटन केले. या प्लांटमध्ये दररोज २ हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे २५ मेगावॅट हरित ऊर्जेची निर्मिती होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की हा प्लांट केवळ या भागासाठीच नाही तर संपूर्ण दिल्लीसाठी एक मोठी भेट आहे. एवढ्या विजेमुळे २५ हजार घरे २४ तास प्रकाशमान होऊ शकतात.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दक्षिण दिल्ली विभागातील सर्व सुका कचरा येथेच टाकला जाईल. ‘वेस्ट टू एनर्जी’चा हा चौथा प्लांट आहे. सध्या, दिल्लीमध्ये तीन कचरा वीज प्रकल्प आधीच कार्यरत आहेत. एक गाझीपूर लँडफिल साइट्सवर, भालस्वा लँडफिल साइट्सवर आणि तिसरा ओखला लँडफिल साइट्सवर. हा प्लांट दिल्ली महानगरपालिकेने (Delhi Municipal Corporation) PPP मॉडेलवर जिंदाल SAWL च्या सहकार्याने बांधला आहे.
Union Minister @AmitShah inaugurates Municipal Corporation of Delhi's Tehkhand Waste to Energy Plant, Tughlakabad, New Delhi.@AmitShahOffice pic.twitter.com/0Snv3x6xGI
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) October 20, 2022
३६५ कोटी खर्चून उभारला प्लांट
या प्लांटची एकूण किंमत ३६५ कोटी आहे. ज्यामध्ये सरकारने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत सुमारे १०५ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय आणखी १०० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत, तर उर्वरित रक्कम जिंदाल एसएडब्ल्यूएल या खासगी कंपनीने गुंतवली आहे. यावेळी दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी म्हणाले की, या प्लांटच्या उद्घाटनामुळे जवळपास डझनभर गावे आणि वसाहतींना आता या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून कायमचा दिलासा मिळणार आहे.
२०२५ पर्यंत दिल्ली होईल कचरामुक्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले की, त्यांचे सरकार पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मिशनचे स्वप्न साकार करण्यात गुंतले आहे. या अंतर्गत २०२५ पर्यंत दिल्ली कचरामुक्त करण्यासाठी त्यांचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या संदर्भात, तेहखंड ‘वेस्ट टू एनर्जी’ प्लांटचे उद्घाटन मैलाचा दगड ठरेल. यानंतर लवकरच नरेला (Narela) येथे दररोज तीन हजार मेट्रिक टन कचरा विल्हेवाट लावणारा प्रकल्पही सुरू होणार आहे. मात्र, यावेळी अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला.
- हेही वाचा:
- Birthday Special :’इन्कलाब’ची ‘अमिताभ’ बनण्याची कहाणी, वाचा कसा मिळाला पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी
- Agriculture News: रबी हंगामचा कृषी सल्ला वाचा; कारण मुद्दा आहे उत्पादन वाढीचा
- Crop Insurance: नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर; मिळणार या जिल्ह्यांना लाभ
- Health Tips: ‘या’ रुग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर करा हे काम; राहील आरोग्य चांगले
या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशिवाय दिल्लीचे नायब राज्यपाल (एलजी) व्ही के सक्सेना (Deputy Governor VK Saxena), दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी, दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी, दिल्ली सरकारचे मुख्य सचिव नरेश कुमार उपस्थित होते. दिल्ली यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.