Imran Khan : बाब्बो..! तुरुंगातही इम्रान खान यांचा न्याराच थाट; दर महिन्याला खर्च होतात ‘इतके’ पैसे

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान मागील अनेक (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात आहेत. आता तुरुंगात असताना त्यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी मिळाली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत मोठा खुलासा केला आहे. तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. इमरान खान यांना तुरुंगात विशेष सुविधा दिल्या जात आहे असे अहवालात म्हटले आहे. यामध्ये 50 हजार रुपये खर्च स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे या तुरुंगातील 7 हजार कैद्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानचे माजी (Pakistan News) पंतप्रधान इमरान खान यांच्या सुरक्षेबाबत तुरुंग अधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असलेल्या इमरान खानच्या सुरक्षेवर दर महिन्याला 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला याबाबत अहवाल सादर केला आहे.

Pakistan : खर्च कमी करण्याची भन्नाट आयडिया; पाकिस्तान सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Imran Khan

या अहवालानुसार इमरान खान यांना तुरुंगाच्या परिसरात अनेक विशेष सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये 50 हजार रुपये खर्चाचे स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. इमरान खान यांचे जेवण सहाय्यक अधीक्षकांच्या देखरेखीखाली स्वतंत्र स्वयंपाकघरात तयार केले जाते. एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, खान यांना जेवण देण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी किंवा उपाधीक्षकांकडून त्यांची तपासणी केली जाते. यानंतर इमरान खान यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सहापेक्षा जास्त डॉक्टरांची टीम येथे नियुक्त करण्यात आली आहे. अतिरिक्त तज्ज्ञ पथके नियमित तपासणी करत असतात

त्यांना एकूण सात कक्ष देण्यात आले आहेत. यापैकी दोनमध्ये ते राहतात. उर्वरित पाच कक्ष काही कारणांमुळे बंद आहेत. या कक्षांमध्ये साधारणपणे 35 कैद्यांना ठेवले जाते. खान यांच्या कोठडीत तसा कुणीही प्रवेश करू शकत नाही. जागोजागी सुरक्षा व्यवस्था आहे. खान यांना भेटायचे असेल तर आधी परवानगी घेणे आवश्यक आहे. या कक्षाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Pakistan News : आधी राष्ट्रपती आता पंतप्रधान! पाकिस्तान सरकारच्या ‘या’ निर्णयाची जगभरात चर्चा

Imran Khan

या तुरुंगात दर दहा कैद्यांमागे एक कर्मचारी नेमला जातो. पण खान यांच्या सुरक्षेसाठी दोन अधिकारी आणि तीन वैयक्तिक सुरक्षा 15 जवानांचा समावेश आहे. याशिवाय कारागृह परिसरात अन्य व्यवस्था देखील करण्यात आले आहेत. न्यायालयीन कामकाजा दरम्यान व्यापक सुरक्षा प्रोटोकॉल लागू केले जातात.

Leave a Comment