नवी दिल्ली : कर्जाच्या विळख्यात अडकलेला आणि मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या कंगाल पाकिस्तानचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तसेही पाकिस्तान सरकारकडे देश चालवण्यासाठीही पैसे राहिलेले नाहीत, असे खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनीच कबूल केले आहे. त्यामुळे या देशात सध्या काय परिस्थिती आहे, याचा अंदाज येईल. आताही असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून विरोधी पक्षांनी सरकावर टीकेची झोड उठवली आहे.
पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या ऑडिट रिपोर्टनुसार, कोरोना महामारीच्या काळात देशातील गरीब लोकांना जे खाद्य पदार्थ वितरीत केले गेले ते पदार्थ अत्यंत खराब दर्जाचे होते. तसेच या काळात सरकारने सुरू केलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा खुलासा या रिपोर्टने केला आहे. कोरोना काळात गरीबांना जे खाद्य पदार्थ दिले गेले, यासाठी सरकारने जो काही खर्च केला तो योग्य पद्धतीने केला नाही. हा रिपोर्ट पाकिस्तान सरकारच्या वित्त मंत्रालयाने जारी केल्याचे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे.
कोरोना काळात सरकारने साखर, पीठ, तेल, तूप, डाळी आणि तांदूळ अनुदानित दरात उपलब्ध करुन दिले होते. मात्र, यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. स्टोर कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने गरीब लोकांना जे खाद्य पदार्थ दिले त्या पदार्थांचा दर्जा अत्यंत खराब होता, असेही या अहवालात म्हटले आहे. कोरोना काळात वाढत्या महागाईमुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी इम्रान सरकारने मदत पॅकेज घोषित केले होते. यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये तरतूद केली होती. या पैशांतून देशातील गरीब लोकांना कमी दरात आवश्यक खाद्य पदार्थ पुरवठा करण्याचा उद्देश होता.
प्रत्यक्षात मात्र, या योजनेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. गरीबांना अत्यंत खराब दर्जाचे खाद्य पदार्थ दिले गेले. या मुद्द्यावर आता जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
बाब्बो.. अमेरिकेच्या एकाच झटक्याने चीन-पाकिस्तान हैराण; कोट्यावधींचा बसणार फटका
अर्र… इंग्रजांचा आणखी एक विचित्र निर्णय; पाकिस्तानचे होणार कल्याण, अफगाणिस्तानचा त्रास वाढणार..