Improve Heart Health : हृदयाचे आरोग्य बिघडतयं? तर मग आजच करा ‘हे’ महत्त्वाचे काम

Improve Heart Health : आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागेल. तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेची आहे. हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकता.

निरोगी आरोग्यासाठी चालणे खूप महत्वाचे

समजा तुम्ही बैठी जीवनशैली जगत असाल तर याचा अर्थ तुम्ही दिवसभर बसून काम करत असता. अशा वेळी व्यायाम तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. समजा जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्ही कमीत कमी तुम्ही 10-15 मिनिटे चालायला सुरुवात करा. हे लक्षात घ्या की सुरुवातीला दहा मिनिटांच्या चालण्याचाही आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यानंतर हळूहळू वेळ मर्यादा वाढवा.

नाश्त्यावर करा लक्ष केंद्रित

तुम्हाला सकाळी पहिली गोष्ट काय खायला आवडते? याची काळजी घ्या. तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सकाळची सुरुवात फळांनी करा. तुमच्या नाश्त्यात ओट्स आणि दलिया यांसारखे संपूर्ण धान्य खा.

स्नॅक्स

संध्याकाळी अनारोग्यकारक चिप्स आणि कुकीज खाण्यापेक्षा तुम्ही बदाम, अक्रोड, शेंगदाणे खा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते सॅलडमध्ये घालूनही खाऊ शकता. हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

आहारात समावेश करा फळे आणि भाज्या

हे लक्षात घ्या की भाज्या जवळपास प्रत्येकाच्या आहारात असतात. पण फळे आणि भाज्या जरा जास्त प्रमाणात खावी. ब्रोकोली, पालक या भाज्या केवळ सॅलडच्या स्वरूपात खा. तुमच्या आहारात फळांचे प्रमाण वाढवावे.

कॅलरीजचे प्रमाण वाढू देऊ नका

चहा, कॉफी, सोडा, कोल्ड्रिंक्स यासारख्या पेयांमुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे अशा गोष्टी घेऊ नका. कारण हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Leave a Comment