Aadhaar Card: देशातील कारोडो आधार कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी देत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
युजर्सना ही सुविधा UIDAI च्या वेबसाइट आणि मोबाइल App वर मिळणार आहे. या सुविधा नुसार आता आधार कार्डधारक आधारशी लिंक केलेला मोबाइल फोन आणि ई-मेल आयडी सहजपणे व्हेरीफाय करू शकतील.
UIDAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, यामुळे लोकांना भीती वाटत होती की आधार ओटीपी दुसऱ्या मोबाइल नंबरवर गेला तर त्यांना कळणार नाही. आता या सुविधेमुळे लोक त्यांच्या आधारशी कोणता मोबाईल किंवा ई-मेल आयडी लिंक आहे हे सहज शोधू शकतात.
आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही
निवेदनानुसार, ही सुविधा अधिकृत वेबसाइट किंवा m-Aadhaar अॅपद्वारे ‘ईमेल/मोबाइल नंबर’ पडताळणी वैशिष्ट्याअंतर्गत घेतली जाऊ शकते. मोबाईल नंबर लिंक नसतानाही ही सुविधा लोकांना सूचित करते आणि त्यांना त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची सूचना देते.
मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली असल्यास रहिवाशांना स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. मेसेजमध्ये असे म्हटले जाईल की तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर आमच्या रेकॉर्डमधून आधीच व्हेरीफाय आहे. आधार क्रमांक घेताना त्याने/तिने दिलेला मोबाईल क्रमांक कोणाला आठवत नसेल, तर अशावेळी तो/ती ‘माय आधार’ पोर्टल किंवा mAadhaar अॅपवर नवीन सुविधेअंतर्गत मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन अंक तपासू शकतो.
स्वतःला असे अपडेट करा
मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरीफाय करण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in किंवा mAadhaar अॅपवर जावे लागेल आणि ईमेल / मोबाइल नंबर व्हेरीफाय करा वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून अपडेट करू शकता.