Important Deadlines । सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला याच महिन्यात आधारपासून पेटीएम फास्टॅगपर्यंतची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. तुम्ही ही कामे पूर्ण केली नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
मोफत आधार अपडेट
UIDAI ने आधार अपडेटसाठी मोफत अपडेट सुरू करण्यात आले होते. यात तुम्हाला घरबसल्या सहजपणे तुमचे आधार ऑनलाइन अपडेट करता येईल. आता ही सुविधा फक्त 14 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध आहे. जर तुम्ही आधार केंद्रावर गेला तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
IDBI बँक FD योजना
IDBI बँकेची उत्सव FD योजना मार्चमध्ये बंद होणार असून या योजनेत 7.05 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ ते ७.७५ टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करता येईल.
कर बचत गुंतवणूक
आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर सवलतीचा दावा करण्याची शेवटची संधी फक्त 31 मार्च 2024 पर्यंत असून कर लाभ घेण्यासाठी करदात्यांना जुनी कर व्यवस्था निवडावी लागणार आहे. हे लक्षात घ्या की नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांना कर सूट मिळणार नाही.
किमान शिल्लक
सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदार ज्यांच्याकडे सुकन्या खाते असणाऱ्यांनी मार्च महिन्यात गुंतवणूकीची किमान शिल्लक रक्कम जमा करावी. नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या गुंतवणूकदारांनाही या महिन्यात गुंतवणूक करावी लागत असून नवीन नियमांनुसार, एका आर्थिक वर्षात या दोन्ही योजनांमध्ये किमान रक्कम गुंतवावी. समजा त्याने 1 वर्षात कोणतीही गुंतवणूक केली नाही, तर त्याचे खाते गोठवण्यात येईल.
नंतर खाते सक्रिय करण्यासाठी गुंतवणूकदाराला दंड भरावा लागेल. तसेच NPS मध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तर सुकन्या खात्यात किमान गुंतवणुकीची रक्कम 250 रुपये आहे. खाते गोठवल्यानंतर प्रति वर्ष 50 रुपये दंड आकारण्यात येईल.
SBI FD योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाने 400 दिवसांच्या कालावधीसह अमृत कलश विशेष FD योजना सुरू केली असून या FD योजनेत ७.१० टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळते. ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे, म्हणजेच ३१ मार्चपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.