IMD Rain Alert : सध्या देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यातच आता पुढील 4 दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाने देशातील काही भागांसाठी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांमध्ये पाऊस, वादळ, जोरदार वारे आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये पुढील 4 दिवसांत वादळ आणि वीज पडण्याची शक्यता आहे.
पर्वतांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 मार्च रोजी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. याशिवाय पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये वेगवेगळ्या भागात वादळासह जोरदार वारे वाहतील. या राज्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 ते 14 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 13 मार्च रोजी पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
MVA मध्ये जागावाटपाचा तिढा कायम, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, कोणाला बसणार फटका?
सोमवारी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 14 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेशात 9 ते 13 मार्च या कालावधीत तुरळक हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. ईशान्य भारतात, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 आणि 14 मार्च रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. यासोबतच केरळ आणि माहेमध्ये 9 ते 11 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, 13 मार्च रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वारे वाहतील. यासोबतच विविध भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली आणि परिसरात वातावरण चांगले दिसत आहे.
Airtel ग्राहकांना धक्का! कंपनीने घेतला मोठा निर्णय, आता मोजावे लागणार जास्त पैसे
आज म्हणजेच सोमवारी दिल्लीत तेजस्वी सूर्यप्रकाश दिसत आहे. या आठवड्यात बुधवारी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पावसानंतर तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.