IMD Weather Forecast: सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ३० आणि ३१ जुलै २०२२ दरम्यान काही ठिकाणी तर दिनांक ०१, ०२ आणि ०३ ऑगस्ट २०२२ दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात दिनांक २९ जुलै २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासाह (वार्याचा वेग ताशी ३० – ४० किमी ) जोरदार पावसाची शक्यता आहे. यासह विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) दिनांक ०७ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी राहण्याची शक्यता आहे. (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur)
कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ७५ ते ८१ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ४६ ते ५० % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी ९.७ किमी ते १९.५ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे. खरीप पिकामध्ये मशागती योग्य परिस्थिती असल्यास पिकांतील आंतरमशागतीचे कामे करावीत, असा सल्ला ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र , मोहोळ , सोलापूर (District Agromet Unit (DAMU) Working at Krishi Vigyan Kendra,Mohol,Dist. Solapur) यांच्या हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीने (Agromet Advisory Bulletin of Solapur District) दिल आहे. त्यांनी शेतकऱ्यांना केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे : Krishi Vigyan Kendra, Mohol : Telephone no.: (02189) 233001 / Email: damu.kvkmohol@gmail.com
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय https://t.co/mXFDxBCKi1
— Krushirang (@krushirang) July 30, 2022
- तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी व जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
- पावसाचे उघडीप पाहून व वारा शांत असताना पिकांवर किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- पिकांतील आंतरमशागतीचे कामे पावसाचा अंदाज पाहून करावीत.
- पडणार्या पावसाचे पाणी शेतात साठविण्यासाठी/ मुरविण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.
- गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन सारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
- हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.
Petrol diesel price: सर्वसामान्यांना दिलासा..! पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत ; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय https://t.co/uGWb10vR10
— Krushirang (@krushirang) July 30, 2022