IMD : भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवारी सांगितले, की पुढील पाच दिवस तमिळनाडूमध्ये आणि पुढील दोन दिवस कर्नाटकात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Tamil Nadu And Karnataka) सुरू राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, उत्तर अंदमान समुद्रावरील खालच्या उष्ण कटिबंधीय पातळीवर चक्री वादळाचे परिवलन कायम आहे. पुढील 2-3 दिवसांत ते पश्चिमेकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू, पाँडेचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय आज अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातही पावसाची शक्यता (Rain In Arunachal Pradesh, Meghalaya) आहे. उद्यापासून म्हणजेच 14 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील बहुतांश भागात हवामान (Weather) कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मान्सून माघार घेण्यास गेल्या काही वर्षांत लक्षणीय विलंब झाला असून तो ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. भारतासाठी मान्सून (Monsoon In India) महत्त्वाचा आहे कारण देशाच्या एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी सुमारे 60% जमीन सिंचनाखाली आहे आणि तिथली निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसांत दिल्लीत 625% (63.8 मिमी), हरियाणामध्ये 577%, उत्तराखंडमध्ये 538% आणि उत्तर प्रदेशात 698% जास्त पाऊस झाला. आयएमडीने ३० सप्टेंबर रोजी जाहीर केले होते की पंजाब, चंदीगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीरचे काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधून मान्सून माघारला आहे.

IMD ने मंगळवारी सांगितले की मान्सूनची माघार घेण्याची रेषा उत्तरकाशी (उत्तराखंड), आग्रा (उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर, रतलाम, (मध्य प्रदेश) आणि भरूच (गुजरात) मधून जात आहे. या आठवड्यात वायव्य आणि मध्य भारतातील अधिक भागातून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version