IMD Rain Alert : पुन्हा अवकाळी पावसाचा दणका, ‘या’ भागात कोसळणार धो धो पाऊस

IMD Rain Alert:  केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचा हाल होताना दिसत आहे.

मुंबईत 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घाटकोपर परिसरात होल्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 लोकांचा मुक्त झालाय तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे.

 तर आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दक्षिण भारतातील सर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच केरळ आणि परिसरात गडगडाटासह हलका पाऊस पडू शकतो.

गुजरात, महाराष्ट्र, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर देखील हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

तर दुसरीकडे भारतीय हवामानानुसार, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सर्व भागात तीव्र उष्णतेची शक्यता आहे.  याशिवाय बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानच्या बहुतांश भागात तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

यासोबतच हवामान जवळपास कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये अद्याप कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. या आठवडय़ात या राज्यांमध्ये कडक ऊन पडणार असून दिवसा उन्हाचा तडाखा लोकांना उखडून टाकणार आहे.

Leave a Comment