IMD Rain Alert: नागरिकांनो सावधान.., पुढील काही तासात धडकणार वादळ, ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

IMD Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून देशातील बहुतेक भागात हवामानात झपाट्याने बदल पाहायला मिळत आहे. या बदलामुळे काही भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला इतर काही भागात उष्णतेमुळे लोकांचे हाल होताना दिसत आहे.

 तर आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले दाबाचे क्षेत्र अधिक दाट होऊन तीव्र चक्री वादळाचे रूप धारण करू शकते.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 26 मेच्या मध्यरात्री  पश्चिम बंगालचे सागर बेट आणि बांगलादेशचे खेपुपारा येथे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता यामुळे पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

या राज्यांमध्ये अति उष्णतेचा इशारा

राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहील.

IMD च्या म्हणण्यानुसार, 25 ते 27 तारखेदरम्यान राजस्थानच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 26 आणि 27 तारखेदरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशात आणि 25-27 मे 2024 दरम्यान दिल्लीच्या विविध भागात तीव्र उष्णता दिसून येईल. राजस्थानमध्ये 27 मेपर्यंत आणि पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 25 मेपर्यंत कडक ऊन राहील.

या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, कोलकाता, पूर्व मेदिनीपूर आणि हावडा जिल्ह्यात 26 आणि 27 मे रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना 27 मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. उत्तर आणि दक्षिण ओडिशात 25 मे पासून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

तर उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 7 दिवसांमध्ये असेच हवामान दिसून येईल.

याशिवाय, 26 आणि 27 रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीप, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी तसेच आंध्र प्रदेशात 25 मे रोजी  मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Comment