IMD Rain Alert: एकीकडे देशातील काही राज्यांमध्ये कडक आणि तीव्र उष्णतेमुळे लोकांचे हाल होत आहे तर देशातील काही भागात मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे. तर पुन्हा एकदा महाराष्ट्रासह यूपी – बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भारतात 5 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याचवेळी ईशान्य भारतात 5 आणि 6 मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतही हवामान बदलताना दिसत आहे.
या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज
हवामान खात्यानुसार, 3 ते 5 मे दरम्यान गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येऊ शकते. या राज्यांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे लोकांना घाम फुटू शकतो. याशिवाय तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, गुजरात आणि ओडिशा या भागात पुढील 4 दिवसांत उष्णतेची लाट राहील.
या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 3 आणि 4 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे हलका पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 5 आणि 6 मे रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय 3 मे ते 6 मे दरम्यान जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस/बर्फाची शक्यता आहे.
5 मे ते 8 मे दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद होऊ शकते. याशिवाय 5 मे ते 9 मे दरम्यान बिहार आणि झारखंडमध्ये विविध ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.