IMD Rain Alert: देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातील बहुतेक शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होताना दिसत आहे.
यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्याची राजधानी मुंबईसह (Mumbai) ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या शहरांमध्ये पुढील काही तासात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.
तर दुसरीकडे ठाण्यासह मुंबईच्या काही भागात गेल्या आठवडाभर पावसाने हजेरी लावली. सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळांमध्ये रविवारी सकाळी 8.30 वाजता 24 तासांच्या कालावधीत अनुक्रमे 96.8 मिमी आणि 57 मिमी पावसाची नोंद झाली. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, ठाण्यात याच काळात 144 मिमी पाऊस झाला.
हवामान खात्याने आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. IMD ने मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांच्या अंदाजात म्हटले आहे की, मध्यम पावसाची शक्यता आहे.
IMD च्या नुकत्याच वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 6 ते 8 ऑगस्टसाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ऑगस्टमध्ये सफदरजंगमध्ये आतापर्यंत एकूण 114.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.