IMD Rain Alert: विजांच्या कडकडाटासह ‘या’ भागात मुसळधार पाऊस, येत्या २४ तासांसाठी अलर्ट जारी

IMD Rain Alert : देशातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे नुकसान होत आहे.

भारतीय हवामान विभागाने देशातील काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही भागात पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

T20 World Cup 2024 मधून Virat Kohli होणार बाहेर? निवडकर्ते उचलणार मोठे पाऊल

हवामान खात्याने येत्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. बदलत्या हवामानामुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांनी ग्रासले आहे.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 आणि 14 मार्च रोजी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बर्फवृष्टीसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर हवामानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

सावधान, Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट; जाणून घ्या सर्वकाही नाहीतर ……

याशिवाय 13 मार्च रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 14 मार्चपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 13 मार्च ते 17 मार्च दरम्यान गंगेच्या पश्चिम बंगाल प्रदेशात हलका पाऊस अपेक्षित आहे.

Leave a Comment