IMD Rain Alert : हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (IMD Rain Alert) इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, 29 ऑक्टोबरपासून ईशान्य मोसमी पावसाने दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. यावेळी मच्छीमारांना समुद्रकिनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळसह अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain In Tami Nadu, Andhra Pradesh, Kerala) पडू शकतो.
शनिवारपासून दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain In South India) शक्यता आहे. “बंगालचा उपसागर आणि दक्षिण द्वीपकल्पीय उष्णकटिबंधीय पातळीवर वायव्य वारे वाहण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (29 ऑक्टोबर) दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, असे IMD ने म्हटले आहे.
IMD नुसार, 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळसह देशातील अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, “तामिळनाडू, पाँडेचेरी आणि कराईकलमध्ये 29-31 तारखेदरम्यान वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 रोजी केरळ आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडू शकतो.
IMD च्या म्हणण्यानुसार, “तामिळनाडू, पाँडेचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पूर्व राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये (Rain In Sikkim) पाऊस पडू शकतो. हवामान अंदाजानुसार पाच दिवस देशभरात हवामान (Weather) कोरडे राहील. ईशान्य मान्सून 20 ऑक्टोबरला तामिळनाडूत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सितरंग चक्रीवादळामुळे (Cyclone Sitrang) त्याला विलंब झाला. पेरुंबदूर, तिरुचिरापल्ली, नागापट्टिनम आणि तिरुवरूरसह राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस देशातील उर्वरित भाग कोरडे राहतील.
- हे ही वाचा : Heavy Rain: अबब… या ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस; शहर झाले जलमय
- Nanded Rain : जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा, कापसाच्या वाती झाल्या तर सोयाबीनला फुटले कोंब
- IMD Weather Forecast: आला की हवामान अंदाज; मध्य-पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात..