IMD Rain Alert : देशात 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
तर दुसरीकडे 30 आणि 31 ऑगस्ट रोजी देशातील अनेक राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे सध्या देशातील अनेक भागात हवामान झपाट्याने बदलत आहे.
भारतीय हवामान विभागानुसार आसाम आणि मेघालयसह ईशान्य भारतात आज मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील चार दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते.
तर दुसरीकडे बिहारमध्ये मान्सून कमकुवत होताना दिसत आहे. याशिवाय 3 सप्टेंबरपर्यंत हिमाचल प्रदेशात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. बहुतांश भागात सूर्यप्रकाश असेल, त्यामुळे तापमानात वाढ होईल.
इथे मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबरला आसाम आणि मेघालयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यासोबतच काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण भागात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.