IMD Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

IMD Rain Alert:  भारतीय हवामान विभागाकडून  या आठवड्यात महाराष्ट्रात धो धो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच बरोबर देशातील इतर काही राज्यांमध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा विभागाने दिला आहे.

याशिवाय, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस अपेक्षित असताना, एक ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळे 128 रस्ते बंद झाले आहेत. यासोबतच वीज, पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवाही विस्कळीत झाल्या आहेत.

हिमाचलमध्ये परिस्थिती बिघडत आहे

हिमाचलमधील परिस्थिती इतकी बिघडली आहे की IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसाचा प्रभाव फक्त उत्तरेकडील राज्यांपुरताच मर्यादित नाही. मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या भागांसह मध्य भारत देखील हाय अलर्टवर आहे कारण IMD ने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरील मच्छिमारांना वादळी हवामानामुळे, ताशी 35 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आठवड्यात दिल्लीतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जेथे तापमान 34.2 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्येही पावसामुळे परिस्थिती बिकट आहे. जयपूर, अलवर, करौली, सवाई माधोपूर, दौसा या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. करौली आणि हिंडौनमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी राजधानी जयपूरमध्ये दिवसभर अधूनमधून पाऊस सुरू आहे.

Leave a Comment