IMD Rain Alert : पुन्हा एकदा देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतात पुन्हा एकदा पावसाळा सुरू झाला आहे. पश्चिम हिमालयीन भागात 2 मार्चपर्यंत पाऊस, बर्फवृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीतील हवामान स्थिती
दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे हवामानाचा मूड पूर्णपणे बदलला आहे. पावसानंतर राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले.
मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव चेतावणी
IMD नुसार, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हिमवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या भागात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
10 वर्षांत ‘या’ स्टॉकने दिला 1200 टक्के परतावा; 1.2 लाखांची झाली कमाई
IMD ने म्हटले आहे की, “जम्मू-काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. 02 मार्चपासून पंजाबमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम हिमालयीन प्रदेशात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात 3 मार्चपर्यंत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पंजाबमध्ये आज विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. लखनौ, मेरठ, बिजनौर, रामपूर, बरेलीसह अनेक ठिकाणी आज ढग, गडगडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठा संघटनेकडून मोठी घोषणा! आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ….
याशिवाय बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये आज पावसाची शक्यता आहे. हिमाचल आणि उत्तराखंडच्या काही भागात बर्फवृष्टीही होऊ शकते.