IMD Rain Alert : सध्या पाऊस (Rain) काही थांबण्याचे नाव घेत नाही. ऑक्टोबर महिना अर्धा उलटला तरी अगदी मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. हजारो हेक्टरवरील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. रब्बी हंगामातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. शेतात सगळीकडे पाणी साचले आहे. साखर कारखान्यांचे गाळप हंगामही लांबण्याची शक्यता दिसत आहे. असे नुकसान होत असतानाही पावसाने माघार घेतलेली नाही. आता तर चक्री वादळाचेही (IMD Rain Alert) संकट येऊ पाहत आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपर्यंत ते आणखी बळकट होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत म्हणजे सोमवारपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ते चक्री वादळात (Cyclone) तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या (Diwali Festival 2022) सणात पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
आयएमडीने म्हटले आहे की उत्तर अंदमान समुद्र आणि त्याच्या शेजारच्या खालच्या उष्णकटिबंधीय पातळीमध्ये बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील तामिळनाडू (Tamil Nadu) किनारपट्टीवर चक्रीवादळ परिवलन पासून कुंड पसरत आहे. यामुळे शनिवारपर्यंत तामिळनाडू, कराईकल, केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये (Heavy Rain In Tamil Nadu, Kerala, Karnataka, Lakshadweep) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD ने म्हटले आहे की, “अंदमान आणि निकोबार बेटांवर 19-22 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि मध्य भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशाच्या अधिक भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
- Must Read : Pune Heavy Rain : आयुक्तांनी फोडले पावसावर खापर
- Nanded Rain : जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा, कापसाच्या वाती झाल्या तर सोयाबीनला फुटले कोंब
- Rain Alert : पावसाचा मुक्काम कायम.. आज ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस; जाणून घ्या..