IMD Alert: सोलापूर: भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Regional Meteorological Centre Mumbai) यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ०२ त्ते ०७ ऑगस्ट २०२२ दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात दिनांक ०२, ०३ आणि ०४ ऑगस्ट २०२२  रोजी  तुरळक ठिकाणी मेघगर्जना,  विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्‍यासाह (वार्‍याचा वेग ताशी ३० – ४० किमी ) पावसाची शक्यता आहे. (Weather Forecast Prediction / Agromet Advisory Bulletin of Solapur District  Prepared by District Agromet Unit (DAMU) Working at Krishi Vigyan Kendra,Mohol,Dist. Solapur)

तसेच विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर)  दिनांक ०८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी व जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. तसेच पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामीण कृषि मौसम सेवा-जिल्हा कृषि हवामान केंद्र (कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर) यांनी केले आहे. (Madhya Maharashtra (Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur) division.)

 • पिकांतील आंतरमशागतीचे कामे पावसाचा अंदाज पाहून करावीत.
 • पडणार्‍या पावसाचे पाणी शेतात साठविण्यासाठी/ मुरविण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.
 • हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.
 • शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
 • मेघ गर्जना विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नये म्हणून काठी बांबू च्या सहय्याने आधार द्यावा.
 • शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे.
 • जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
 • जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून लांब बांधावीत.
 • वाहने झाडाखाली उभी करू नयेत.
 • काढणी केलेला शेती माल प्लास्टिकच्या शीटणे झाकावा.
 • विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळा
 • जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये

Share.

Leave A Reply

Exit mobile version