IMD Alert : देशात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर देखील आला आहे.
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हे जाणुन घ्या शुक्रवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने तेलंगणासाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. हैदराबाद हवामान केंद्राचे संचालक डॉ के नगररत्न यांनी एएनआयला सांगितले की, “पुढील 24 तासांत हैदराबाद शहरात अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबादला पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओडिशातील नबरंगपूर, कालाहांडी, नुआपाडा आणि बालंगीर या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की आज कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की हिमाचल प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.