Night Dream : रात्री झोपत असताना अनेकांना विविध प्रकारच्या स्वप्न येतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे का? हे स्वप्न देखील काहीतरी संदेश देत असतात. मग जाणुन घ्या कोणती स्वप्ने शुभ मानली जातात?
आंबे दिसणे
रात्रीच्या स्वप्नात आंबे दिसणे खूप शुभ मानले जाते. हे दर्शविते की तुमच्या समस्या संपणार आहेत.
स्वप्नात कावळा दिसणे
स्वप्नात कावळा दिसणे खूप शुभ मानले जाते. हा वाईट दिवसांचा अंत आणि चांगल्या दिवसांची सुरुवात मानला जातो. अशी स्वप्ने इतर कोणाशीही शेअर करू नयेत.
कमळाचे फूल दिसले तर पैसे मिळतील
जर तुम्हाला स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. कमळ हे लक्ष्मी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ तुमचा त्रास संपणार आहे.
बासरी हे शुभाचेही प्रतीक आहे
स्वप्नात बासरीचा आवाज ऐकणे किंवा स्वतःला बासरी वाजवताना पाहणे हे शुभाचे प्रतीक मानले जाते. अशी स्वप्ने पाहणे हे दर्शविते की तुमच्या आयुष्यात गोडवा येणार आहे आणि जीवन आनंदी होणार आहे.
सकाळची स्वप्ने सत्यात उतरतात
याशिवाय स्वप्न पाहण्याचा काळही चांगला मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीने 3 ते 5 वाजेच्या दरम्यान स्वप्न पाहिले तर ते खरे होण्याची शक्यता जास्त असते.
पाण्याने भरलेला कलश देखील शुभ असते
तसेच स्वप्नात पाण्याने भरलेला कलश पाहणे खूप शुभ मानले जाते. असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अमाप संपत्ती मिळू शकते.
पैसे जमिनीत गाडलेले दिसणे
स्वप्नात जमिनीत पैसे गाडलेले दिसले तर तेही खूप शुभ मानले जाते. अशी स्वप्ने पाहणे म्हणजे भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.
फळांनी भरलेले झाड पाहणे शुभ मानले जाते
स्वप्नात फळांनी भरलेले झाड पाहणे खूप शुभ मानले जाते. असे स्वप्न रोजच्या जीवनाशी संबंधित आहे. असे स्वप्न आपल्या प्रयत्नांचे फळ दर्शवते.
टीप: वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीच्या सत्यतेची आम्ही गॅरंटी देत नाही.