Credit Card Guideline : जर तुम्ही देखील शॉपिंग साठी किंवा इतर आर्थिक कामासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने बँक आणि NBFC क्रेडिट कार्ड जारीकर्त्यांना आता ग्राहकांना एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय प्रदान करावा लागेल. यामुळे आता बँकेचे क्रेडिट कार्ड घेताना, ग्राहकांना कोणते नेटवर्क क्रेडिट कार्ड हवे आहे हे विचारले जाईल. बँकिंग व्यवस्था मजबूत करण्यासाठी आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे.
जुन्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना देखील पर्याय मिळेल
हे देखील जाणून घ्या कि, आरबीआयच्या या निर्णयानंतर आता जुन्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. त्यांना आता कार्ड अपडेट करताना त्यांचा नेटवर्क बदलण्याचा पर्याय मिळणार आहे. कार्डची वैधता संपल्यानंतरही ग्राहक नेटवर्क बदलू शकतील.
महायुतीसाठी अमित शहा तयार करणार मास्टर प्लॅन, जागावाटपाचा फॉर्म्युला होणार फिक्स?
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या संस्थांचे कार्ड नंबर 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना हे नियम लागू होणार नाहीत. हे नियम अधिसूचनेच्या तारखेपासून 6 महिन्यांसाठी लागू असतील.
क्रेडिट कार्ड नेटवर्क म्हणजे काय?
भारतात 5 मोठ्या कार्ड नेटवर्क कंपन्या आहेत – Visa, MasterCard, RuPay, American Express आणि Diners Club. या कंपन्यांचे विविध वित्तीय संस्थांसोबत टाय-अप आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या नेटवर्कचे कार्ड निवडण्याचा पर्याय मिळत नाही.
एकापेक्षा जास्त नेटवर्क निवडणे फायदेशीर ठरेल
सध्या काही कार्ड नेटवर्क त्यांच्या क्रेडिट कार्डवर इतरांपेक्षा जास्त वार्षिक चार्ज वापरकर्त्यांकडून घेतात यामुळे, जर कोणतीही बँक तुम्हाला एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्कचा पर्याय देत नसेल, तर तुम्हाला सर्वात जास्त शुल्क असलेले नेटवर्क निवडण्याची सक्ती केली जाईल.
मालामाल होण्याची सुवर्णसंधी! मिळणार बंपर पैसा, फक्त करा ‘हे’ काम
जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्कचा पर्याय मिळाला, तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार, त्याची फी आणि नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या सुविधांनुसार निवड करू शकाल.