ICC T20 World Cup Virender Sehwag: Mumbai: T20 विश्वचषक स्पर्धा 2022 (ICC T20 World Cup) मध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याचे चाहते निराश झाले आहेत. पाकिस्तानचा (Pakistan) पराभव हे अनेकांच्या आनंदाचे कारण राहिले असले तरी, पाकिस्तानच्या पराभवामुळे झिम्बाब्वेशिवाय (Zimbabwe) भारतीय चाहते आणि माजी क्रिकेटपटूही खूश आहेत. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याच्या जखमेवर मीठ शिंपडले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांनी असे ट्वीट केले की, शेजारच्या देशाच्या एका चाहतीला मिरची लागली. मात्र, यानंतर सेहवागने तीची बोलतीच बंद केली.
खरं तर, पाकिस्तानच्या पराभवानंतर सेहवागने ट्विट केलं होतं, ‘हाहाहा… राष्ट्रपतीही मस्त खेळले.’ यावर पाकिस्तानी चाहत्याने सेहवागला सल्ला दिला की, तुम्ही तेव्हाच आनंद व्यक्त केला पाहिजे जेव्हा भारत चॅम्पियन बनेल. या चाहत्याने लिहिले, ‘सेहवाग भाई जास्त हसू नका, तुम्ही कोणता वर्ल्ड कप जिंकला? दुसऱ्याच्या नुकसानापेक्षा स्वतःच्या आनंदात जास्त आनंद झाला पाहिजे. जिंकलात तर सेलिब्रेट कर.” यावर सेहवागने दिलखुलास उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, ‘२३ ला यापेक्षा मोठा आंनद आम्ही साजरा केला.’
Sehwag Bhai ziada na Hanso kn sa WorldCup Jeet Gai ho Ap. Dusro ki Haar sa Ziada apni Khushi par Khush hona chahyay. Jeet jao to Khushi manana https://t.co/xju3NdgBhA
— Sehar 🇵🇰 (@Sehar__56) October 27, 2022
23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध विजय
23 ऑक्टोबरला T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. एक वेळ अशी होती जेव्हा पाकिस्तान हा सामना सहज जिंकत होता पण विराट कोहलीच्या (Virat Kohli) झटपट अर्धशतकी खेळीने पाकिस्तानचा सामना हिरावून घेतला.
झिम्बाब्वेचाही झाला पराभव
यानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पाकिस्तानी संघाला केवळ 131 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. त्यानंतर मधल्या फळीतील बाबर (Babar) किंवा रिझवान (Rizwan) दोघेही फ्लॉप झाले. परिणामी पाकिस्तानी संघ सलग दोन सामने हरला. आता उपांत्य फेरी गाठणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 world cup Bhuvneshwar Kumar: ‘अशी’ असेल भारताची पुढील सामन्याची रणनीती; कारण…
- ICC T20 World Cup 2022: अर्र ‘हा’ पाकिस्तानी चिडला की..आणि भारतविषयी केले ‘हे’ धक्कादायक वक्तव्य
- T20 World Cup 2022: भारताच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूच्या नावे होणार नवा विक्रम; पहा काय असेल हा विक्रम
- Delhi air toxic during Diwali: अरे बापरे…ऐन दिवाळीत ‘येथील’ हवा अत्यंत प्रदूषित; लोकही पर्यावरणाप्रती बेजबाबदार