ICC T20 World Cup PAK vs SA: Mumbai: T20 विश्वचषक 2022 मधील उपांत्य फेरीची शर्यत रोमांचक बनली आहे आणि पाकिस्तानने आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गुरुवारी, ३ नोव्हेंबर रोजी सिडनी (Sydney) येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) पावसाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ३३ धावांच्या (डकवर्थ लुईस नियम) मोठ्या फरकाने पराभव केला. यासह पाकिस्तानचे ४ गुण झाले असून, या जोरावर पाकिस्तानला शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्या आशा कायम ठेवण्यात यश आले आहे. दुसरीकडे, या निकालाने दक्षिण आफ्रिकेला दणका दिला आहे, तर भारतीय संघही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यांना अखेरचा सामना जिंकावा लागणार आहे.
उपकर्णधार शादाब खानच्या (Vice Captain Shadab Khan) जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने 1999 पासून विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी मालिका सुरू ठेवली. त्याच वेळी, मागील अनेक स्पर्धांप्रमाणे, पुन्हा एकदा पावसाने दक्षिण आफ्रिकेचा निकाल निश्चित करण्यात मोठी भूमिका बजावली. पाकिस्तानकडून मिळालेल्या 186 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या 3 षटकांत क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्या विकेट्स गमावल्या. दोघांना शाहीन शाह आफ्रिदीने (3/14) आपला बळी बनवले.
Pakistan keep semi-final hopes alive, clinching a win in the Group 2 clash against South Africa 🌟#T20WorldCup | #PAKvSA | 📝: https://t.co/3VVq7VAJLt pic.twitter.com/hfsNzCivam
— ICC (@ICC) November 3, 2022
शादाबने अडचणी वाढवल्या
मात्र, संघासाठी कर्णधार टेंबा बावुमाने (Captain Temba Bavuma) खराब फॉर्मच्या मालिकेला थोडा ब्रेक लावला आणि 36 धावा (19 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार) करत संघाला खराब सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. इथेच शादाब खानने मॅच चेंजिंग ओव्हर टाकले. आठव्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या शादाबने पहिल्या चेंडूवर बावुमा आणि तिसऱ्या चेंडूवर एडन मार्करामची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर 9व्या षटकानंतर पाऊस आला आणि तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 4 गडी बाद 69 अशी होती.
पाऊस पुन्हा खलनायक ठरला
पावसानंतर खेळ सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 73 धावांची गरज होती. पहिल्याच षटकात हेनरिक क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्सने शादाब खानवर 14 धावा घेतल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात क्लासेनने शाहीनवर सलग 2 चौकार मारले, पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो त्याच षटकात बाद झाला. इथून पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी आपली पकड घट्ट केली आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 108 धावांवर (9 विकेट्स) रोखून मोठा विजय नोंदवला.
- हेही वाचा:
- Pune Municipal Corporation : महापालिकेत साखळी बॉम्ब स्फोट
- ICC T20 World Cup 2022 IND vs BAN: अर्र…’या’ सामन्यावर संकटाचे ढग; भारताचे समीकरण बिघडू शकते
- ICC T20 World Cup 2022 ENG VS NZ: आजच्या विजयाने ‘इंग्लंड’च्या आशा पल्लवित; जाणून घ्या आजच्या सामन्याचा वृत्तांत
बाबरचा फ्लॉप शो सुरूच
पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्याच्या इराद्याने सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) उतरला होता. कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे पावसाची शक्यता असताना संघाने अगोदरच मोठी धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिकेला दडपणाखाली आणता आले. मात्र, पाकिस्तानने जशास तसे सुरुवात केल्याने अशा सर्व आशा धुळीला मिळाल्या. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) पहिल्याच षटकात बाद झाला, तर कर्णधार बाबर आझम (4) आणि शान मसूदही स्वस्तात बाद झाले.
इफ्तिखार-शादाब यांची धमाकेदार फलंदाजी
पाकिस्तानने सातव्या षटकापर्यंत अवघ्या 43 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यातही मोहम्मद हरिसच्या बॅटमधून केवळ 11 चेंडूत 28 धावा झाल्या. या युवा फलंदाजाला पहिल्यांदाच विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने छोटी पण झटपट खेळी केली. येथून इफ्तिखार अहमदने पुन्हा एकदा पाकिस्तानचा डाव सांभाळला.
यादरम्यान, हलका पाऊस पडत होता, ज्यामुळे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण थोडे कठीण झाले होते. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये आफ्रिकन गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. याचा फायदा घेत शादाबने (52 धावा, 22 चेंडू, 3 चौकार, 4 षटकार) अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचवेळी इफ्तिखारने (51 धावा, 35 चेंडू) आणखी एक अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या 8 चेंडूत फक्त 8 धावा दिल्या आणि 4 विकेट घेत थोडी भरपाई केली आणि पाकिस्तानला 185 धावांवर रोखले.