ICC T20 World Cup IND vs SA: टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात चांगली झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सवर मात करत 4 गुण मिळवले आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या केएल राहुलवर (K L Rahul) सर्वांचे लक्ष असेल. त्याला या सामन्यात स्थान मिळेल का? सलग दोन अपयशानंतर ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी द्यायला नको का? हे प्रश्न आणि सल्ले सातत्याने उपस्थित होत आहेत आणि आता टीम इंडियाने त्याचे उत्तर दिले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी 30 ऑक्टोबरला पर्थमध्ये (Perth) आमनेसामने होणार आहेत. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील तिकीट जवळपास निश्चित होणार आहे. पण बलाढ्य आफ्रिकन संघाचा सामना करणे इतके सोपे नसेल आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूला पूर्ण ताकद लावावी लागेल. केएल राहुलला या प्रकरणात आतापर्यंत यश आलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 0 आणि नेदरलँडविरुद्ध (Netherlands) केवळ 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या.

राहुलवर विश्वास ठेवा

साहजिकच आगामी सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) त्याच्या जागी अन्य कोणाचा समावेश करण्याचा प्रश्न उपस्थित होणार असला तरी त्याला पूर्ण संधी मिळणार असल्याचे टीम इंडियाने स्पष्ट केले आहे. पर्थमधील सामन्याच्या एक दिवस आधी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (Batting coach Vikram Rathore) म्हणाले, आम्ही राहुलला वगळण्याचा  विचार करत नाही आहोत. तरीही दोन सामने ही अगदी सुरुवात आहे. तो चांगली फलंदाजी करत आहे, सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच आम्ही सध्या त्याबद्दल विचार करत नाही.

राहुलने आशिया चषकाद्वारे टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याच्या बॅटमधून काही दमदार खेळी निघाल्या, पण सातत्याचा अभाव आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली विश्वचषकात सातत्याने चांगली फलंदाजी करत असताना आणि रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनीही शेवटच्या सामन्यात फलंदाजीची ताकद दाखवली असताना राहुलवर दडपण निर्माण होणे साहजिकच आहे.

पंतला संधी मिळेल का?

ऋषभ पंतच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. या स्टार यष्टीरक्षक फलंदाजाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्थान मिळाले नाही. अशा स्थितीत त्याला संधी मिळावी का, या प्रश्नाच्या उत्तरात प्रशिक्षक राठोड म्हणाले, ”दुर्दैवाने एका संघात केवळ 11 खेळाडूच खेळू शकतात. मला माहित आहे की ऋषभ पंत एक महान फलंदाज आहे. कोणत्याही संघाविरुद्धच्या सामन्यात तो काय करू शकतो हे आपण पाहिले आहे. म्हणूनच आम्ही त्यांना तयार राहण्यास सांगत आहोत. कधीही संधी मिळू शकते.”

Share.

Leave A Reply

Exit mobile version