ICC T20 World Cup 2022 IND vs BAN: Mumbai: अॅडलेडच्या (adelaide) मैदानावर बुधवारी T20 विश्वचषकात भारताची गाठ बांगलादेशशी होणार आहे. भारताचा ग्रुप 2 मधील हा चौथा सामना आहे, पण या सामन्याबाबत अॅडलेडमधून वाईट बातमी समोर येत आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून अॅडलेडमध्ये सतत पाऊस पडत आहे. मंगळवारीही सकाळपासूनच वातावरण बिघडले असून, सकाळपासूनच पाऊस आणि थंडीमुळे नागरिकांची दैना झाली आहे. बुधवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आता संकट असे आहे की बुधवारीही पाऊस असाच सुरू राहिला तर उपांत्य फेरी गाठण्याचे भारताचे समीकरण बिघडू शकते.
बुधवारी सकाळपासूनच अॅडलेडमध्ये पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यावेळी अॅडलेडचे तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या वेळी भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात सामना होणार आहे, त्या वेळी पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो. पावसामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पूर्णपणे पुढे ढकलला जाऊ शकतो. यामुळे भारताचा खेळ खराब होईल आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांनाही धक्का लागू शकतो.
Horrible weather. Rain and chilly. pic.twitter.com/h0PrTgXMux
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) November 1, 2022
गुणतालिकेत भारताचे स्थान
टीम इंडिया 4 गुणांसह ब गटात दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत आरामात जाण्यासाठी टीम इंडियाला शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यांचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे, त्यामुळे टीम इंडियाला दोन गुण सहज मिळतील अशी अपेक्षा आहे. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला तर भारताला फक्त एक गुण मिळेल.
पाऊस पडला तर?
पावसामुळे हा सामना रद्द झाला तर भारताचे ५ गुण होतील. त्यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) करा किंवा मरो असा सामना खेळावा लागणार आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवला तर त्याचे ७ गुण होतील आणि ते उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल. पण झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरला तर पाकिस्तानची (Pakistan) स्पर्धेत राहण्याची शक्यता वाढेल. जेव्हा पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा (south africa) पराभव केला आणि त्यांचे 6 गुण असतील, तेव्हा ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022 ENG VS NZ: आजच्या विजयाने ‘इंग्लंड’च्या आशा पल्लवित; जाणून घ्या आजच्या सामन्याचा वृत्तांत
- ICC T20 World Cup 2022 AFG vs SL: अर्र… ‘हा’ संघ विश्वचषकातून पडला बाहेर; वाचा या रोमहर्षक सामन्याचा वृत्तांत
- Export of rice: केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे हा निर्णय
- Crop damage in Marathwada: ‘या’ भागातील हे आस्मानी संकट; जाणून घ्या येथील परिस्थिती