ICC T20 World Cup 2022 Harbhajan Singh: Mumbai: दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे, कारण ज्या कामासाठी निवडकर्त्यांनी त्याची ICC T20 विश्वचषक-2022 साठी संघात निवड केली आणि त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याला पसंती देत प्लेइंग-11 मध्ये संधी देत आहेत त्या संधीच सोन करताना कार्तिक दिसून येत नाही. होय, कार्तिक त्या अपेक्षा पूर्ण करत नाही. मात्र, भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) कार्तिकचा बचाव केला आहे. कार्तिकशिवाय इतर अनेक फलंदाज चांगली कामगिरी करत नसून त्यांच्यावर टीका होत नसल्याचे हरभजनने म्हटले आहे.
या विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियासाठी फक्त विराट कोहलीचीच बॅट तळपली आहे. कोहलीने या विश्वचषकात आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत आणि तिन्ही भारताने जिंकले आहेत. त्यांच्याशिवाय केएल राहुल, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी एका सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.
ICC T20 World Cup 2022 IND VS ZIM: न्यूझीलंडच्या विजयाने भारतीय संघाला दिलासा; जाणून घ्या सविस्तर वृत्त https://t.co/DtuiESJ6Ff
— Krushirang (@krushirang) November 4, 2022
त्यांचा दर्जा उंच आहे
स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना हरभजन म्हणाला, “जेव्हा दिनेश कार्तिकला दुखापत झाली होती, तेव्हा मी पंतला तंदुरुस्त असल्यास घेऊन ये, नाहीतर तुम्ही कार्तिकला खेळवू शकता असे सांगितले होते. तुम्ही त्याला घेतले कारण तो फिनिशर आहे आणि तुम्ही पंतला तिथ नाही खेळवू शकत जिथे कार्थिक खेळी खेळतो.
दरम्यान, अँकरने हरभजनला रोखले आणि म्हणाला, ‘परंतु 3 अपयश आले आहेत कार्तिकला’ यावर हरभजनने उत्तर दिले आणि म्हणाला, “बघा, इतर खेळाडूही अपयशी ठरले आहेत. पण त्याचा दर्जा उंच आहे, म्हणूनच आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. जिथे दिनेश कार्तिकची फलंदाजी करतो ते सर्वात कठीण काम आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि एमएस धोनीचे (M S Dhoni) कौतुक करावे तितके कमी आहे. त्याच्यानंतर जर कोणी दिसला असेल तर तो म्हणजे हार्दिक पांड्या (Hardik Pandya). जर तुम्हाला कार्तिक मिळाला असेल तर त्याला संधी द्या.”
‘तीन संधींनी फ्लॉप समजू नका’
हरभजन म्हणाला की, कार्तिकला फक्त तीन वेळा फ्लॉप मानू नये. तो म्हणाला, “त्या माणसाने खूप मेहनत केली आहे, धावाही केल्या आहेत. फक्त तीन संधींनंतर तो फ्लॉप झाला आहे असे समजू नका. संधी समान असावी. वरील लोकांना सपोर्ट मिळत आहे, त्यामुळे खाली असलेल्यांनाही तो मिळाला पाहिजे.
कार्तिकची T20 विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी पाहता, त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) एक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सहा आणि बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) सात धावा केल्या. म्हणजेच विश्वचषकात कार्तिकच्या बॅटमधून केवळ 14 धावा निघाल्या आहेत.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022 Shahnawaz Dahani: पाकच्या ‘या’ खेळाडूने एक दिवस अगोदरच दिल्या कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
- ICC T20 World Cup 2022 ENG vs SL: ‘या’ संघासाठी आजचा सामना महत्वाचा; उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी असेल प्रयत्न