मुंबई: T20 विश्वचषक सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने 5 विकेट्सवर 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 115 धावांत गारद झाला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला गेला. केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो 51 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव 61 धावांवर नाबाद राहिला.
T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि झिम्बाब्वेचे संघ प्रथमच आमनेसामने आले होते. याआधी उभय संघांमध्ये सात T20 सामने खेळले गेले ज्यात भारताने पाच जिंकले तर दोनमध्ये बांगलादेश विजयी झाला. झिम्बाब्वेबरोबर सामना जिंकल्यानंतर आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लडशी असणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत तगड्या टीमसोबत भारताचा सामना रंगणार आहे.
भारताची कमजोरी पुन्हा समोर आली
पुन्हा एकदा भारताला दमदार सुरुवात करता आली नाही. भारताला पहिला धक्का रोहित शर्माच्या रूपाने 27 धावांवर बसला. रोहितला केवळ 15 धावा करता आल्या. तथापि, भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आहे आणि त्याने 35 चेंडूत 51 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध कोहलीही राहुलला जास्त वेळ साथ देऊ शकला नाही आणि 26 धावा करून बाद झाला. यानंतर काही वेळातच राहुलच्या रूपाने भारताला 95 धावांवर तिसरा धक्का बसला.
सूर्यकुमार यादवची बॅट तळपली
राहुलनंतर सूर्यकुमार यादवची बॅट जोरदार तळपली. या फलंदाजाने आपल्या ओळखीच्या तुफानी शैलीत धावा केल्या. सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. टीम इंडियाने शेवटच्या 5 षटकात 79 धावा केल्या आणि यासह झिम्बाब्वेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात टीम इंडियाला यश आले. या पाच षटकांत भारताने फक्त एक विकेट गमावली.
पंतला संधी साधता आली नाही
राहुल पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर काही वेळातच ऋषभ पंतही 3 धावा करून बाद झाला. दिनेश कार्तिकच्या जागी पंतला या स्पर्धेत प्रथमच संधी देण्यात आली होती, मात्र या संधीचे तो फायदा घेऊ शकला नाही. पंत सपशेल अपयशी ठरला.
झिम्बाब्वेसाठी 187 धावांचे लक्ष्य खूपच कठीण होते. यासाठी त्याला चांगली सुरुवात हवी होती जी त्याला मिळाली नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा अर्धा संघ 36 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. T20 विश्वचषक सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकांत 115 धावांत गारद झाला.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: भारतीय गोलंदाज चमकले; झिम्बाब्वेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
- ICC T20 World Cup 2022: अरे बापरे…भारताने दिले 187 धावांचे लक्ष्य; झिम्बाब्वेची मात्र सुमार कामगिरी