मुंबई: झिम्बाब्वे विरुद्ध टी20 विश्वचषक सुपर 12 च्या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात आहे. केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो 51 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव 61 धावांवर नाबाद राहिला. विराट कोहलीही चांगलाच रंगात दिसला. त्याने 25 चेंडूत 26 धावा केल्या. झटपट धावा काढण्याच्या नादात शॉन विल्यम्सच्या एका चेंडूवर मोठा शॉट खेळत विराट झेलबाद झाला. दिनेश कार्तिकच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ऋषभ पंतने निराशा केली आणि तो 5 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने वेस्ली माधविरेला विराट कोहलीकरवी झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेला आणखी एक धक्का दिला आहे. अर्शदीपने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर रेगिस चकाबवाला बाद करून झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला. एकूण दोन धावांवर झिम्बाब्वेने त्यांची दुसरी विकेट गमावली. चकबाबवाला 6 चेंडू खेळूनही खातेही उघडता आले नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने डावाच्या सातव्या आणि पहिल्या षटकातील सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर भारताला तिसरे यश मिळवून दिले. शमीने 11 धावांवर शॉन विल्यम्सला भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केले. झिम्बाब्वेच्या संघाने सहा षटकांत २८ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या.
झिम्बाब्वेने आतापर्यंत १२ षटकांत 5 गडी गमावून एकूण ८१ धावा केल्या आहेत. मोहम्मद शमीने टोनी मुन्योंगाला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले. डावाच्या आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शमीने टोनीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: अरे बापरे…भारताने दिले 187 धावांचे लक्ष्य; झिम्बाब्वेची मात्र सुमार कामगिरी
- ICC T20 World Cup 2022: भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात भारताला पहिला धक्का, ‘हा’ क्रिकेटर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला