मुंबई: झिम्बाब्वे विरुद्ध टी20 विश्वचषक सुपर १२ च्या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात आहे. केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो ५१ धावा करून बाद झाला. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव ६१ धावांवर नाबाद राहिला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली. परंतु सुरुवातीलाच रोहित लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मात्र विराट कोहली आणि के एल राहुलने चांगली खेळी करत ५० धावांची भागीदारी लवकर पूर्ण करून भारताचा डाव मजबूत केला. परंतु त्यानंतर विराटही २६ धावाच करू शकला. के एल राहुल नेही भेदक कामगिरी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यांनतर तोही लागलीच आउट झाला. हार्दिक पांड्या ही म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही आणि तोही स्वस्तात आउट झाला. मात्र सुर्यकुमार यादवने आपली नेहमीसारखी खेळी करत आजही मोलाचे योगदान दिले. त्याने आजच्या सामन्यात झिम्बाम्ब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करताना आपले अर्धशतक पूर्ण करून या वर्षीचा त्याचा टी २० तील १००० रनांचा टप्पा ही पूर्ण केला. या यादीत तो प्रथम स्थानी विराजमान झाला आहे.
झिम्बाब्वे मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर मात्र खराब खेळी खेळत असल्याचे दिसून आले. या संघाचे दोन खेळाडू लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. या सुमार खेळीमुळे भारताने दिलेले एवढे मोठे आव्हान झिम्बाब्वेला पूर्ण करणे कठीण दिसते आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात भारताला पहिला धक्का, ‘हा’ क्रिकेटर स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला
- ICC T20 World Cup 2022: ‘या’ संघाची धडाकेबाज कामगिरी; उपांत्य फेरीत स्वतःची जागा केली पक्की