ICC T20 World Cup 2022: Mumbai: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानच्या पराभवाने पाकिस्तानी चाहत्यांची आणि दिग्गजांची मने तुटली आहेत. आपल्या संघाला एवढ्या मोठ्या उलथापालथीचा बळी पडताना पाहून पाकिस्तानी खेळाडू आता भारतासाठीही आपल्या मनातील भडास काढत बेताल वक्तव्य करत आहेत. पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) पराभवानंतर म्हटले आहे की, या आठवड्यात पाकिस्तान (Pakistan) आपल्या देशात परतत आहे आणि पुढच्या आठवड्यात भारतही आपला बस्तान गुंडाळून मायदेशी परतेल.
Not Pak successive defeats but Major disappointment for @shoaib100mph India is playing well and advancing 😝..😂 pic.twitter.com/KoT4xLaKgd
— d@$h 🌐 (@dashman207) October 27, 2022
रावळपिंडी एक्स्प्रेस (Rawalpindi Express) या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने दोन महिन्यांपूर्वीच भाकीत केले होते की, पाकिस्तानने जो संघ निवडला आहे, तो पाहता तो पहिल्याच फेरीत बाहेर पडेल असे वाटते. आणि आता हे घडल्यामुळे भारताचा प्रवासही फायनलपर्यंत पोहोचणार नाही, अशी टिप्पणीही भारताविषयी त्याने केली आहे.
अख्तर म्हणाला भारत सेमीफायनल हारेल
टी-20 विश्वचषकात गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा झिम्बाब्वेविरुद्ध एका धावेने पराभव झाला. या पराभवानंतर शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर (YouTube channel) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानच्या व्यवस्थापनावरच टीका केली नाही तर भारतावरही निशाणा साधला आहे. तो म्हणाला, ‘पाकिस्तान संघ (Pakistan Team) या आठवड्यात तर भारत पुढील आठवड्यात मायदेशी परतेल. तो (भारत) काही तीस मार खान देखील नाही. उपांत्य फेरीतही तो पराभूत होऊन मायदेशी जाईल.
शोएब अख्तरने पाकिस्तानच्या बाहेर पडण्याची भविष्यवाणी केली होती
जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकणारा या दिग्गज खेळाडूने आपल्या बोर्डालाही खडे बोल सुनावले. सरासरी व्यवस्थापन, सरासरी माणसे, सरासरी विचारसरणी यामुळे असे परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या दिवशी पीसीबीने (PCB) T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला, त्याच दिवशी अख्तरने सांगितले की, पाकिस्तान पहिल्या फेरीत (In the first round) बाहेर पडेल. तो म्हणाला, ‘तुम्हाला असा संघ निवडून या खेळाडूंसोबत जायचे असेल, तर लक्षात ठेवा की ऑस्ट्रेलिया (Australia) तुमच्यासाठी फुलांचा हार घेऊन उभा राहिला नाही. बॉल किंचित स्विंग केला कि सर्व चीत होतील. मला भीती वाटते की पाकिस्तान पहिल्या फेरीतच बाहेर तर नाही ना पडेल.
- हेही वाचा:
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट
- T20 World Cup 2022: भारताच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूच्या नावे होणार नवा विक्रम; पहा काय असेल हा विक्रम
- T20 World Cup: सामना सुरु होण्याआधीच पावसाचा व्यत्यय; गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताचा असेल प्रयत्न
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण